आपला जिल्हा

भेलसई, चिरणी येथील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश ;शिवसेना नेते रामदासभाई कदम, आ. योगेश कदम यांनी प्रवेशकर्त्या ग्रामस्थांचे केले स्वागत

चिपळूण - ओंकार रेळेकर

चिपळूण – तालुक्यातील भेलसई व चिरणी येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश नुकताच शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम, मंडणगड-दापोली-खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशकर्त्या ग्रामस्थांचे स्वागत करीत गावाच्या विकासासाठी सहकार्य राहील, अशी ग्वाही या नेत्यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद माजी बांधकाम समिती सभापती अण्णा कदम, तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण, लोटे गणविभाग प्रमुख योगेश आंब्रे, उपविभाग प्रमुख रवींद्र महाडिक, भेलसई शाखाप्रमुख अंकुश कदम आदी उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांपासून गुहागर विधानसभा मतदारसंघातील अन्य पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. पक्ष प्रवेश दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामध्ये भेलसई येथील ग्रामस्थांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे.

यामध्ये सुरेंद्र कदम, महादेव महाडिक (ग्रामपंचायत सदस्य), नारायण मोडक, विश्वास मोडक, किसन बने, काशिनाथ भुवड, नारायण गोवळकर, विठ्ठल मोडक, रघुनाथ भुवड, जगन्नाथ बंगाल, रवींद्र मोडक, वसंत जाधव, शरद धाडवे, श्रीकांत बहुतले, महेंद्र बहुतले, शंकर कदम, प्रताप सावंत, राजेश कदम, सुरेश कदम, सुभाष कदम, संतोष भेलसईकर, दत्तात्रय गजमल, विष्णू गजमल, रामचंद्र गजमल, किसन गजमल, भास्कर धाडवे, संदीप कदम, दत्ताराम गजमल, शीतल भेलसईकर, सुभाष कदम, गोपीनाथ कदम, सुरेश कदम, प्रताप सावंत, शरद धाडवे, वसंत जाधव, विठ्ठल मोडक आदी ग्रामस्थांनी प्रवेश केला आहे.तसेच चिरणी येथील गंगाराम शिंदे, शिवाजी बुरटे, योगेश खापरे, प्रभाकर खापरे, अरुण कदम, हरिचंद्र खांडेकर, यशवंत खांडेकर, राजेंद्र खांडेकर, यशवंत कदम यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button