संगमेश्वर तालुका शिवसेना(उध्दव बा. ठाकरे) पक्षाच्या कार्यकारणी बैठक संपन्न ; कोकण पदवीधर निवडणूक साठी मतदार नोंदणी अभियान सुरू
देवरुख - सुरेश सप्रे

देवरुख – आगामी काळात येणाऱ्या कोकण पदवीधर निवडणूक साठी मतदार नोंदणी अभियान जोरकसपणे राबविणे साठी रत्नसिंधू, साडवली येथे बने यांच्या निवासस्थानी संगमेश्वर तालुका शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकारणी बैठक संपन्न झाली.
शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी. माजी आम. सुभाष बने. जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी मार्गदर्शन केले.
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदार नोंदणी बाबत आणि व इतर ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुक संदर्भात शिवसेना संगमेश्वर तालुका कार्यकर्त्यांनी सर्तकपणे मतदार नोंदणी करून पक्षाची ताकद वाढविणेसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करणेत येवून पदवीधर मतदारांची नेंदञीला सुरूवात करणेत आला.
यावेळी वेळी शिंदे गटातील अमित मोहीरे, अजिंक्य जाधव, संचित भिंगार्डे व अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
त्याप्रसंगी संगमेश्वर तालुकाप्रमुख नंदादीप बोरुकर, जया माने, प्रदुमन्न माने,तालुका युवाधिकारी मुन्ना थरवळ, तालुका युवाधिकारी तेजस शिंदे, शाखाप्रमुख वैभव जाधव,अमोल जाधव, राजा आंबेकर, अमोल पाटील, यांतेसह उप तालुकाप्रमुख, विभागीय संघटक, विभागप्रमुख, उप विभाग प्रमुख, शिवसेना, युवासेना, महिला कार्यकारणी, शिवसहकार सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, वकील बार सेना, आरोग्य सेना, शिक्षक संघटना, आजी माजी जि प, पं. स,सदस्य नगरसेवक सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



