आपला जिल्हा

खेर्डी ग्रामपंचायत कार्यालयात मनसेची धडक

चिपळूण - ओंकार रेळेकर

चिपळूण – महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर अध्यक्ष अभिनव भुरण यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत शुक्रवारी खेर्डी ग्रामपंचायत येथे धडक दिली. गावातील एका वाडीमध्ये दहशतवाद विरोधी पाथकाने संशयईत म्हणून ३ बांग्लादेशी नागरिकांना अटक केली. सदर घटना ही खूपच भयानक आणि विचार करायला लावणारी आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोणती लोक राहतात याची प्रशासन म्हणून काहीच माहिती नाही असे यातून लक्षात येते. यामुळे उद्या इखादी मोठी घटना घडली तर आश्चर्य वाटायला नको. खेर्डी गावात भाड्याने किंवा नवीन घर घेऊन राहणारी लोक कोण आहेत? कुठून आली आहेत याची माहिती किंवा त्या संबंधीचे कागदपत्र आपण लक्ष पूर्वक खरंच मागवून घेतो का? भाडे करार पत्र त्यासोबत त्यांचे आधार, रेशनकार्ड असे अनेक कागद आपल्याजवळ आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित कारण्यात आले.महाराष्ट्र नवनिर्माण सेना चिपळूणच्या मध्यमातून आपल्या या संदर्भात तातडीने माहिती जमा करून त्यावर कडक कारवाई करावी, अशी सूचना करण्यात आली. तसे पत्र सरपंच सौ.अपर्णा

दाते व ग्रामसेवक यांना देण्यात आले. यावेळी शाखा अध्यक्ष प्रशांत हटकर, माजी तालुका प्रवक्ता प्रमोद महाडिक, वार्ड अध्यक्ष अविनाश महाडिक, संदेश महाडिक, सुमित चिले, रणजित आवले, तेजस दाते, मंगेश दाते, किरण कुंभार, ओंकार मोहिते, संकेत उतेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button