
खेड मधील भरणे समर्थ नगर शिक्षक कॉलोनी येथे कवड्या प्रजातीचा साप आल्याची माहिती दुरध्वनीव्दारे वन विभागाला दिली. कळविलेल्या माहितीच्या अनुषंगाने सदरील कवड्या प्रजातीच्या सापाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरक्षीतरित्या ताब्यात घेवून त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून जीवनदान देण्यात आले. या वन कर्मचाऱ्यांनी कवड्या प्रजातीच्या सापाला ताब्यात घेवून येथील नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
सदरचे बचावकार्य. प्रकाश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल खेड सुरेश उपरे, वनरक्षक रानबा बंबर्गेकर, डोईफोडे. ढाकणे. यश सोळंके, दिपराज पवार यांनी पूर्ण केले. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्रि क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागामार्फत केले गेले आहे.



