शिवसेनेच्या लोटे विभाग संघटकपदी महेंद्र मोरे यांची निवड

चिपळूण – शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी शिवसेना लोटे विभाग संघटकपदी महेंद्र मोरे, अल्पसंख्याक सेल उपतालुकाप्रमुखपदी अजीम काझी, सोनगाव शाखाप्रमुख योगेश घाग, धामणदेवी जि. प. गण उपविभाग प्रमुख महेंद्र घोरपडे यांची निवड केली आहे. या निवडीबद्दल या सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातलक्ष घातले असून या मतदारसंघात संघटन मजबूत करीत असताना विकासकामांसाठी गेल्या काही महिन्यात गावोगावी निधी मंजूर केला आहे. यातून अन्य पक्षातील पदाधिकारी व ग्रामस्थ शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश करीत आहेत.
यानंतर शिवसेना नेते रामदासभाई कदम या शिवसैनिकांवर पक्षवाढीसाठी जबाबदाऱ्या सोपवत आहेत. यामध्ये लोटे विभाग संघटक पदी महेंद्र मोरे,अल्पसंख्यांक सेल उप तालुकाप्रमुख पदी अझीम काझी, धामणदेवी जि. प. उपविभागप्रमुख पदी महेंद्र घोरपडे, सोनगाव शाखाप्रमुख पदी योगेश घाग यांची निवड केली आहे.
या निवडीबद्दल जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण, माजी बांधकाम समिती सभापती अण्णा कदम, लोटे विभाग प्रमुख योगेश आंब्रे, उपविभाग प्रमुख रवींद्र महाडिक आदींनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे.



