आपला जिल्हा

कितीही मातब्बर उमेदवार असला तरी विजय मिळिवणारच- आ. शेखर निकम

शिरगावमधील युवा ग्रुपचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

चिपळूण : गेली पाच वर्षे मतदार संघात विविध विकास कामे केली, डोक्यात कधी हवा गेली नाही आणि कोणाच्या बोलण्याने आपल्याला भोके पडणार नाहीत, पण आमच्या डोक्यात विकासकामे व्हावीत, याची हवा नक्कीच आहे आणि ती कायम राहील. आम्हाला विकास करायचा आहे, त्यात आज शिरगावमधील युवा ग्रुपमधील ४० तरुणांनी बाबू साळवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तरुणाची एक मोठी फळी उभी राहिली. उद्या विधानसभा निवडणुका लागतील आणि अजितदादा यांनी कोणालाही उमेदवारी द्यावी, मागील पाच वर्षापूर्वी मतदार संघातून दहा हजारचे लीड घेतले होते, पण यावेळी २५,०००चे लीड घेणार, कितीही मातब्बर उमेदवार असला, तरी हे करून दाखविणारच, असा विश्वास आ. शेखर निकम यांनी गुरुवारी व्यक्त केला.

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी गटात आ. शेखर निकम यांच्या उपस्थितीत शिरगाव येथील विविध पक्षातील युवक आणि महिलांनी प्रवेश केला. पूर्व विभागातील हा सर्वात मोठा पक्ष प्रवेश झाला.

यावेळी आ. निकम, ज्येष्ठ नेते दादा साळवी, माजी उपसभापती सूर्यकांत खेतंले, माजी पं. समिती सदस्य रमेश राणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आबू ठसाळे, जिल्हाध्यक्ष अजिंक्य आंब्रे, युवक अध्यक्ष निलेश कदम, उपाध्यक्ष प्रतिक सुर्वे, महिला तालुकाध्यक्षा सौ. जागृती शिंदे, माजी पं. समिती सदस्य बाबू साळवी, शिरगाव सोसायटीचे चेअरमन जयंत शिंदे, माजी सरपंच अनिल शिंदे, माजी सरपंच नीलेश कोलगे, माजी सरपंच मधुकर इंदुलकर, शिरगाव तंटामुक्त अध्यक्ष लियाकत कुटरेकर, माजी उपसरपंच बाबा कुटरेकर, ग्रामपंचायत सदस्य नीलेश कोलगे, रूचिराज भागडे, प्रवीण सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार निसार शेख यांच्या ‘सॉरी’ या लघुपटाने अनेकांची मने जिंकली आहेत. सध्या तो सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.याबाबत आ. निकम यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

शिरगाव युवा ग्रुपमधील राजेंद्र मेस्त्री, मनोज सुतार, जयेश पांचाळ, स्वप्नील सुतार, शुभम डेरवणकर, सुमित डेरवणकर, रितेश डेरवणकर, अभिषेक डेरवणकर, ओंकार डेरवणकर, गोरेश डेरवणकर, संजय पांचाळ, अमित पांचाळ, दिनेश फके, रोहित गोटल, संदेश मेस्त्री, मनोज नांदलस्कर, आदित्य शिरकर, साहील मेस्त्री, आर्यन मेस्त्री, रोहन यादव, आयुष सुतार, स्वप्नील मोरे, प्रशांत मुंढेकर, सुरेश फाळके, पार्थ सुतार, अनिकेत मेस्त्री, संदेश तांबटकर आदी युवकांनी आ. निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button