आपला जिल्हा

येडगेवाडीचे शेठ सखाराम गोविंद येडगे यांचे दुःखद निधन ; वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

संगमेश्वर – येडगेवाडी गावचे सखाराम गोविंद येडगे सोमवारी ४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता वृध्दापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर ५ डिसेंबर रोजी येडगेवाडी येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निधनासमयी के ८६ वर्षाचे होते. त्यांच्या बालपणी त्यांनी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत दिवस काढले मात्र चाकरमानी होत त्यांनी स्वतासह घराची स्थिती बदलून समाजात शेठ पदवी मिळवली. सखाराम शेठ हे मनमिळावू आणि शांत व मृदू स्वभावाचे होते त्यांचे सर्वांनाच कौतुक होते ते सर्वांना चांगले मार्गदर्शन करत एकीचे महत्व पटवून देत असत

गावडे घराण्याचे धोंडीबा विठा येडगे हे मुंबईत पहीले पाउल ठेवणारे चाकरमानी होते तर त्यांच्या पावलावर पावले ठेवत सखाराम गोविंद येडगे हे त्या पिढीतले दुसरे चाकरमानी म्हणून स्थिर होणारे चाकरमानी होते त्यानंतर येडगेवाडीतील इतरांनी मुंबईची वाट पाहीली आणि मुंबईकडे सर्वांची पावले वळली सखाराम येडगे मुंबईत राहून समाजात लोकमान्य शेठ ही पदवी मिळवली धोंडीबा विठा येडगे आणि सखाराम गोविंद येडगे यांच्यामुळे येडगेवाडीकरांनी मुंबईची वाट पाहील्याने चाकरमानी मंडळींनी ही सखाराम येडगे यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले.

त्यांच्या निधनामुळे येडगेवाडी ग्रामस्थ,नातेवाईक, कुटुंबीय यांच्याकडून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सूना,नातवंडे,मुली,जावई,भाऊ, पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button