कडवई त रिक्षा संघटनेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन .

संगमेश्वर – तालुक्यातील कडवई ग्रामपंचायत हॉल येथे रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले . यावेळी रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह नव्वद रिक्षाव्यवसाईक हजर होते .
महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी विविध अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कडवई मध्येही ग्रुपग्रामपंचायत कडवई , रिक्षा मालक चालक संघटना , बौद्धजन विकास मंडळ , तसेच सर्व शाळामधून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले .
ग्रामपंचायत हॉल कडवई येथे रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली याच्यावतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी बोलताना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी सर्वच समाजातील आजच्या तरुण पिढीने बाबासाहेबांची शिकवण आचरणात आणली तर समाजाच्या प्रगतीबरोबरच समाजात वाढलेली गुंडगिरी , व्यसनाधीनता कमी होऊन समाज प्रगती करेल असे सांगितले . बाबासाहेब आंबेडकर याना एका विशिष्ट चौकटीत सीमित न ठेवता त्यांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे असे ते म्हणाले .
यावेळी उपाध्यक्ष संदीप चिले , सचिव मोहन ओकटे , सहसचिव संदीप येलोंडे ,खजिनदार रुपेश रहाटे , सह खजिनदार राजा येलोंडे, सदस्य बावा मयेकर , प्रमोद शिंदे , दिलीप जोयशी , राजेंद्र भोजने , मोहन कुंभार , दिनेश कुवळेकर ,अरफात खतीब ,रुपेश कदम यांच्यासह नव्वद रिक्षाव्यवसाईक उपस्थित होते .



