संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे (मराठवाडी) ग्रामस्थांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश ; हरपुडे गावाचा नियोजनबद्ध विकास करणारच – आ. शेखर निकम
संगमेश्वर - विलास गुरव

संगमेश्वर – आ. शेखर निकम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हरपुडे मराठवाडी येथील ग्रामस्थांनी सावर्डे येथे जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये राजेश शिर्के, प्रकाश चिले, उदय शिर्के, ऋषिकेश महाडीक, प्रमोद चिले, राकेश शिर्के, अभय किर्वे, प्रणव शिर्के, महेश केसरकर, सुहास कोटकर, दिपक घुग, राजेश्वरी शिर्के, निधी चिले, रिया शिर्के, विद्या शिर्के, दिलीप घुग, उमेश शिर्के याचा समावेश आहे. या प्रवेशकर्त्याचे आमदार शेखर निकम यांनी आभार मानले व राष्ट्रवादी पक्षामध्ये स्वागत केले.
याचवेळी बेलारी सापतेवाडी येथील शैलेश शेलार व हातीव येथील निलेश सावंत यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला
पक्षप्रवेशावेळी आमदार शेखर सर ग्रामस्थांना म्हणाले की, प्रत्येकाने गावातील विकास कामे करताना हेवेदावे विसरुन एकत्र येऊन विकास करणेचे दृष्टीने प्रयत्न करावा. उगाचच वैयक्तिक वाद व राजकारण न करता कामे करावीत. पक्ष संघटना बळकट करण्याचा निर्धार करा आणि गाव विकास व गाव समृद्ध करण्याचा मानस बाळगावा. विकास कामांची जबाबदारी माझी राहील असा शब्द आमदार निकम यांनी हरपुडे मराठवाडी ग्रामस्थांना दिला.
यावेळी राजेंद्र पोमेंडर, बाळूशेठ ढवळे, बाबुशेठ साळवी, नितिन भोसले, मंगेश बांडागळे, अजिक्य आंब्रे, सुशिल भायजे, बंधु सुर्वे, ओमकार गायकवाड, जितेंद्र नलावडे, अक्षय चव्हाण इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



