तालुका कार्यकारिणी जाहीर झालेवर संगमेश्वर तालुका भारतीय जनता पार्टी मध्ये संदोपसंदी सुरू
देवरुख - सुरेश सप्रे

संगमेश्वर – भारतीय जनता पार्टी तालुका कार्यकारिणी जाहीर झालेवर संगमेश्वर तालुका भारतीय जनता पार्टी मध्ये संदोपसंदी सुरू झाली असून युवा कार्यकर्तेंच्यातील खदखद समोर आली असून तालुका युवा मोर्चा कोषाध्यक्ष मयुर निकम यांनी युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तालुकाध्यक्ष यांची निवड केली गेली असल्याचा आरोप करत आपल्या काही समर्थकांसह राजीनामाचे हत्यार उपसलेने तालुका भाजपमध्ये आलेबेल नसल्याचे दिसत आहे. मयुर निकम यांचे सोबत 2 शक्तिकेंन्द्र प्रमुख दहा बुथ प्रमुख यांनी राजीनामे वरिष्ठांना पाठवले असल्याने तालुका भाजपात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना मषुर निकम यांनी नाराजी व्यक्त करत लवकरच पालीच्या गणरायाचे दर्शन घेऊन पुढील राजकीय भुमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले तालुकाध्यक्ष निवड हि एकतर्फी झाल्याने असंख्य कार्यकर्ते नाराज असल्याचे मयुर यांनी सांगून पक्षाला मोठा हादरा देण्याचे संकेतच दिले. मयुर निकम हे सोशल मिडीया असो की पक्षाच्या कामात युवा कार्यकर्ते म्हणून तालुक्यात त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते तालुका पदाधिकारी निवड होताच त्यांनी न काही युवा मोर्चाचे पदाधिकारी यांनी सर्व पदाचे राजीनामा दिले आहेत. यात जय कुमार चाळके, सोशल मीडिया अनिकेत भालेकर, बुथ प्रमुख माखजन संदेश मिरगळ.. बुथ प्रमुख राकेश चाळके..डिंगणी शक्ती केंद्र प्रमुख धामापूर शक्ति केंद्र प्रमुख. क्रृषिकेष निकम लांजा सोशल मीडिया, सागर चाळके, सुर्यकांत तळेकर.मनोहर निकम,,आराध्या नीकम. प्रमोद माने,राजेश चाळके. संदिप चाळके, कुन्डु चव्हाण,प्रकाश कांबळे, रोशन चाळके, मा.बुथ प्रमुख स्वपनील मोहिते, बुथ प्रमुख या सारख्या असंख्य कार्यकर्ते यांनी आपल्या पदाचे राजीनामा दिले आहेत
यांच्या राजीनाम्यावर जिल्हा भाजपा नेते काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे..



