वकृत्व स्पर्धेत मृण्मयी जोग, दिपीका हटकर विजेते ;विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळातर्फे तालुकास्तकीय स्पर्धा

चिपळूण – समाजभीमुख विविध उपक्रम राबविणाऱ्या खेर्डी येथील विठ्ठलवाडी गणेशमित्र मंडळाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेत आठवी ते दहावी या मोठ्या गटात दिपीका हटकर हिने प्रथम क्रमांक मिळवला. तर अथर्वी चव्हाण हिने द्वितीय आणि श्रावण कदम हिने तृतीय क्रमाकांने बाजी मारली. तर पाचवी ते सातवी गटात मृण्मयी जोग हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
खेर्डीतील विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाच्यावतीने गणेशोत्सवनिमीत्ताने विविध उपक्रम राबवले जातात. मंडळाच्या गणेशोत्सवाचे हे दहावे वर्ष असल्याने यावर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सोमवारी (ता.२५) सकाळी झालेल्या तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रामुख्याने यामध्ये मुलींची संख्याच जास्त होती. परीक्षक म्हणून व्याख्याते आणि बलशालीचे संस्थापक अध्यक्ष शिरीष काटकर व रश्मी दाभोळकर उस्थित होते. मंडळाचे सल्लागार दशरथ दाभोळकर यांनी स्पर्धेचा हेतू स्पष्ट करीत मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्पर्धकांना मार्गदर्शन करताना श्री. काटकर म्हणाले, वकृत्व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यानी वाचनावर भर द्यायला हवा. विविध विषयाचे वाचन कराला हवे. पुस्तका सारखा मित्र नाही. वकृत्वात पाठांतराला थारा न देता सहजपणे आणि मोकळेपणाने विषय मांडायला हवा. कोणत्या शब्दावर भर द्यायचा याची जाण असावी. स्पर्धकांची चहुबाजोस असलेल्या प्रेक्षकांवरती नजर रोखायला हवी. वकृत्वातून आपला आत्मविश्वास वाढायला हवा. आत्मविश्वासाने विषयाची मांडणी करण्यावर भर द्यावा. तसेच वकृत्वातून जिल्हा तसेच राज्यपातळीवर काम कमविण्याची जिद्ध बाळगावी, असे आवाहन केले.
मंडळाच्यावतीने सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना मंगळवारी (ता.२६) होणाऱ्या एकांकिका स्पर्धेदरम्यान मान्यवरांच्या हस्ते पारितोषक देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. दिशा दाभोळकर, माजी सरपंच आणि मंडळाचे सल्लागार दशरथ दाभोळकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रणाली दाभोळकर, रियाज खेरटकर, मंडळाचे अध्यक्ष शशांक भिंगारे, प्रशांत दाभोळकर, संभाजी यादव, विकास ढवण गुरूजी, सचिन भोसले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



