साखरपा, कोंडगाव, पुर्ये तर्फे देवळे गावातील विकासकामांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते भूमिपूजन
साखरपा पंचक्रोशीत विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही- पालकमंत्री उदय सामंत

संगमेश्वर- तालुक्यातील साखरपा, कोंडगाव व पुर्ये तर्फे देवळे गावातील विकासकामांचे राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत यांच्याहस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांचे साखरपा येथे आगमन होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
पुर्ये तर्फे देवळे स्ट्रीट लाईटचे उद्घाटन, गवळीवाडी कॉजवे कामाचे भूमिपूजन तसेच पुर्ये तर्फे देवळे जलजीवन मिशन ६६ लाख रुपये मंजूर कामाचे भूमिपूजन पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे कोंडगाव बाजारपेठ रस्ता २० लाख रुपये मंजूर कामाचे भूमिपूजन करण्यात आले. साखरपा परिसरातील गावामध्ये कामांची विकास गंगा पालकमंत्री देतील तसेच पंचक्रोशीत विकास कामांना निधी कमी पडू देणार नसल्याचा शब्द पालकमंत्री उदयजी सामंत यांनी यावेळी दिला आहे.
स्वातंत्र काळापासूनची मागणी पूर्ण करण्यासाठी उदय सामंत यांना पालकमंत्री व्हावे लागले हे माझे भाग्य असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.साखरपावासियांनी हा उत्साह कायम ठेवा मी सदैव तुमच्या बरोबर असल्याचा शब्द पालकमंत्री उदयजी सामंत यांनी दिला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, उद्योजक सिद्धेश ब्रीद, संजय सुर्वे, कोंडगावचे माजी सरपंच बापू शेट्ये, राजेश पत्याने, बापू लोटणकर, ओंकार कोलते, संदीप जोयशी, सुशांत सुर्वे, शीतल गार्डी, नेत्रा शिंदे, संजय गांधी, राजन किर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



