आपला जिल्हा

धनगर, मराठा आरक्षणासाठी संसंदेचे विशेष अधिवेशन बोलवावे शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांची पंतप्रधानांकडे मागणी

संगमेश्वर – राज्यात सध्या मराठा आणि धनगर आरक्षणाचा विषय पेटला असून मराठा आणि धनगर समाजाकडून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. मराठा आणि धनगर समाजाला जातीच्या आधारे आरक्षण देण्याच्या विषयासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलणण्याची मागणी शिवसेना ( उबाठा ) गटाचे लोकसभा गटनेते तथा रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मराठा व धनगर आरक्षणाच्या विषयावर संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे.खासदार विनायक राऊत यांनी २८ ॲाक्टोबर २०२३ रोजी हे पत्र देत मागणी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे – पाटील यांचे जालन्यात आमरण उपोषण सुरु आहे तर राज्यभरात या आंदोलनाचे पडसाद उमटू लागले असून आंदोलन उग्र रुप धारण करु लागले आहे. मराठा समाजाच्या समर्थनार्थ खासदार हेमंत गोडसे, हिंगोली चे खासदार हेमंत पाटील, बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी आपले राजिनामा दिले आहेत. आरक्षण विषयी राजिनामा सत्र सुरु झाले असून विद्यमान सरकारला धक्के बसू लागले आहेत. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी हल्ला करत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे.

मराठा व धनगर आरक्षणामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघत असून सरपंच ते खासदार पर्यंत लोकप्रतीनिधी जनतेच्या सहानुभूतीसाठी आपल्या पदाचे राजिनामा देवून थेट आंदोलकांमध्ये सामील होण्यास सज्ज झाले आहेत अशातच शिवसेना ( उध्दव ठाकरे गटाचे ) लोकसभा गटनेते तथा खासदार विनायक राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची मागणी केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार काय भूमिका घेते याकडे राज्याचे लक्ष लागून राहीले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button