आपला जिल्हा

राजापूर तालुक्यातील महाळुंगे धनगरवाडीत नागरी सुविधांची वानवा ; निवडणूकीत मतांसाठी दारोदार फिरणा-या लोकप्रतिनिधींची विकासाकडे पाठ – ॲडव्होकेट अमित शिंदे

राजापूर – तालुक्यातील माहळुंगे धनगरवाडीत स्वातंत्र्यांच्या सत्तर वर्षानंतर ही अजून मातीचा रस्ता आहे. मागील वीष वर्षांपासून येथील नागरीक धुळखात याच रस्त्यांवरुन प्रवास करत आहेत. हा रस्ता डांबरीकरण व्हावा म्हणून ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना निवेदन देत त्या निवेदनाचा मंत्रालयीन स्तरावर वारंवार पाठपुरावा करत आहेत येथील निवडणूक काळात दारोदार फिरुन मतदान मागणा-या आणि निवडूण आल्यानंतर दुर्लक्ष करणा-या लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे येथील धनगरवाडीत नागरी सुविधा कामे झाली नसल्याचा आरोप नागरीक करत आहेत.

राजापूर माहळुंगे धनगरवाडीत पाण्याचे दुर्मिक्ष्य असून या ठिकाणी नागरीकांना नळपाणी योजनेअंतर्गत दर्जेदार पाणी मिळावे अशी मागणी आहे मात्र इतक्या वर्षात आमदार, खासदार यांनी दुर्लक्ष केल्याने येथील नागरीकांना नळपाणी योजनाच मिळाली नाही. येथील नागरीकांना नळपाणी योजना मंजुर करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

माहळुंगे धनगरवाडीत साधी स्मशानशेड आणि चबुतरा नाही त्यामुळे विकासापासून वंचित राहीलेल्या येथील नागकांचा शेवटचा प्रवास ही खडतर झाल्याचे दिसून येत आहे. जीवंत असताना विकास न पाहीलेल्या नागरिकांच्या शेवटच्या क्षणीही विकासपासून वंचित रहावे लागत आहे.

माहळुंगे धनगरवाडीत पथदिवे लावण्यात यावेत अशी मागणी येथील नागरीकांची आहे. ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे अपेक्षित असताना याकडे ही संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथील नागरीकांना एवढ्या वर्षात विकास काय असतो ते रहायलाच मिळाले नाही. लोकशाहीत मतदान करण्याचा अधिकार आहे मात्र येथील नागरिकांच्या मतादानाचा विकासात्मक उपयोग होताना दिसलाच नाही. निवडणुका आल्या की राजकीय पक्षांचे प्रतिनिधी दारोदारी मतांची भीक मागत फिरतात मात्र निवडूण आल्यानंतर येथील नागरीकांच्या विकासाकडे दुर्लक्ष करतात आता येथील नागरीक आणि ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी गावासाठी पुढाकार घेत थेट राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे आपली कैफियत मांडली असून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी तरी या गावातील नागरीकांना न्याय द्यावा अशी विनंती केली आहे. निवेदनाचा पाठपुरावा ॲडव्होकेट अमित शिंदे करत असून किमान राज्य सरकार तरी आम्हाला न्याय देईल अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button