आपला जिल्हा

सावर्डे गावातील उर्वरित भागातील राष्ट्रीय महामार्गला ही स्ट्रीट लाईट लावण्यात याव्यात सावर्डे गावचे उपसरपंच जमीर मुल्लाजी यांची मांगणी

चिपळूण - विलास गुरव

चिपळूण – सावर्डे गावातून राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा चे चौपदरी करणाचे काम चालू आहे, सावर्डे गावातील राजस्थान हॉटेल ते सहयाद्री हॉटेल पर्यंत स्ट्रीट लाईट लावले गेले आहेत. परंतु सावर्डे गावातील महामार्गचा उर्वरित भाग अंधारात आहे एका दिशेला 40 गावचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे दुसऱ्या दिशेला सावर्डे चा उर्वरित भाग (कसरवाडी )महामार्गला जोडलेला असून दोनी ठिकाणी लोकांची जास्त रहदारी असल्याने त्या भागात स्ट्रीट लाईट बसने अत्यंत गरजेचे आहे. आणि तशी ग्रामस्थाची ही मागणी आहे. ही गरज ओळखून सावर्डे ग्रामपंचायत चे उपसरपंच जमीर मुल्लाजी यांनी उर्वरित भागात ही स्ट्रीट लाईट बसावी अशी विनंती करणारे पत्र कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग,विभाग रत्नागिरी.उपविभागीय अधिकारी राष्ट्रीय महामार्ग, उपविभाग चिपळूण.इगल इन्फ्रा. कंपनी प्रा. ली. कामथे,आमदार शेखर गोविंदराव निकम यांना केली आहे. राष्ट्रीय महामार्गचा कामात सावर्डे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांनी वेळोवेळी खूप सहकार्य केले आहे. याचा महामार्गचा अधिकारी आणि ठेकेदारांनी विचार करावा आणि आमचा विनंती ला पूर्ण करावे, अन्यथा वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button