चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील याशिका शिंदे भविष्यात चिपळूण तालुक्यासाठी नव्हे तर देशासाठी ऑलम्पीक पदक पटकावेल – आ.शेखर निकम
चिपळूण - विलास गुरव

चिपळूण – राष्ट्रीय रायफल नेमबाजी अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेवुन सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकानवर आपले नाव करून त्याच बरोबर तिच्या या यशाची दखल घेवुन महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम समजला जाणारा श्री.छत्रपती पुरस्कार याशिका शिंदे हिला प्राप्त झाल्याने सहयाद्रि फाउंडेशन, कादवड यांच्या वतिने चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम सर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार संपन्न झाला. याशिकाची शिंदे हिची गावाच्या वतीने मिरवणुक ही बैलगाडी, जोरात पडणारा पाऊस व वाजत गाजत काढण्यात आली.
आमदार शेखर निकम म्हणाले की चिपळूण वासियांसाठी हा अतिशय आनंदाचा दिवस आहे माझे मतदार संघातील याशिका शिंदे हिला पुरस्कार मिळाल्याने नक्कीच ती कौतुकास पात्र आहे. त्याच प्रमाणे तिच्या पालकांना ही मनापासून धन्यवाद देत असताना यापूर्वी हा पुरस्कार याशिका च्या वडिलांना प्राप्त झाल्याने अजुनच ऐकुन समाधान वाटले. भविष्यात तुझी कामगिरी अजुन उंचावत गेली पाहिजे तसेच भविष्यात पुन्हा देशाचे नेतृत्व करीत असताना ऑलंपिक स्पर्धेमध्ये तु सहभाग घेशील आणि पदक मिळवशील यात शंका नाही तसेच याही पुढचे पुरस्कार तुला मिळतील ही आशा व्यक्त करतो.आज केवळ तु तुझ्या गावाचे नव्हे तर गावासोबत तालुका, जिल्हा, राज्य व देशाचे नांव झाल याच ही समाधान आम्हा सगळयांना आहे. असे याशिकाचे कौतुक केले. तसचे मॅरेथॉन स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या ओंकार उदेग चे व महावितरण मधुन निवृत्त झालेले श्री. वसंत फाळके यांना देखीली शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले अर्जुन पदक विजेते अशोक शिंदे यांचे ही कौतुक आमदार महोदय यांनी केले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय खेळाडू अशोकराव शिंदे यांनी देखील याशिकाचे कौतुक केले. याशिकाचे वडिल विश्वजीत शिंदे यांनी देखील आमदार साहेब व ग्रामस्थांचे आभार मानले. याप्रसंगी याशिका हिने बोलताना आमदार निकम साहेब यांचे आभार मानले कारण यापुर्वी आमदार महोदयांनी वेळात वेळ काढून प्रत्यक्ष फोन करुन सुध्दा शुभेच्छा दिल्या असून आज प्रत्यक्ष त्यांच्या हस्ते सत्कार झाला हे मला भविष्यात स्पर्धांना स्फुती देणारे आहे व जसे आज सन्मान केला आहे हे लक्षात घेवुन नक्कीच चांगली कामगिरी करेन.
या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, तालुकाध्यक्ष अबु ठसाळे, अर्जुन पुरस्कार विजेते अशोक शिंदे, जे. के. शिंदे, विनायक शिंदे, सतिश शिंदे, मुराद चौगुले, नईम चौगुले, स्वप्नील शिंदे, विजय टाकळे, भाऊ जागुष्टे, आबा शिंदे, नरसिंगराव शिंदे, पांडुरंग शिंदे, अॅड. अमित कदम, राहुल शिंदे, दिनेश शिंदे, गणेश गजमल, संतोष शिंदे, गजानन साळवी, सतिश शिंदें, ग्रामपंचायत सदस्य व चाकरमानी असंख्य प्रमाणत उपस्थित होते.



