महाराष्ट्र

समाजसेवक किसन भोसले यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी 2023 पुरस्कार जाहीर

चिपळूण – 2 ऑक्टोबर 2023 रोजी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी गावचे सुपुत्र, पोलादपूर तालुका रहिवाशी संघ पुणे या संघाचे अध्यक्ष उद्योजक समाजसेवक किसन भोसले यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे आयोजन राहुल भरत शेलार यांनी केले आहे.

सामाजिक क्षेत्रातील किसन भोसले यांचे विशेष योगदान, शैक्षणिक क्षेत्रात हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी केलेली मदत, कारखानदारीच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार समितीच्या वतीने किसन भोसले यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. किसन भोसले यांना 2011 झाली कोंकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते . कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात, 2021 च्या नैसर्गिक आपत्ती काळात किसन भोसले यांच्या माध्यमातून कोंकणातील अनेक गावांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.वाजता गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परस्कार घोषित झाल्यानंतर किसन भोसले यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button