
देवरुख – मल्हार धनगर समाज भवनाचा – नूतन सभागृहाचा उद्घाटन कार्यक्रम आमदार शेखर निकम यांच्या हस्ते नुकताच पार पडला
यावेळी आमदार शेखर निकम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की “आज या सभागृहाचे उद्घाटन होत असताना आपल्या सर्वांना मनोमन आनंद होत आहे, या सभागृहाचे (समाज भवन )काम पूर्ण होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम शेळके हे माझ्या संपर्कात राहून, पाठ-पुरावा करून सभागृहाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करीत होते”
आमदार शेखर निकम यांनी त्यांना शब्द देऊन कामासाठी सुरुवातीला १२ लाख व त्यानंतर ८ लाख असा भरघोस निधी उपलब्ध करून दिला व उर्वरित राहिलेल्या कामासाठी अजून निधी उपलब्ध करून देऊ असा शब्द दिला, तसेच आपण सर्वांनी एकत्रित येऊन या सभागृहाचे काम चांगल्या पद्धतीने करून घेऊ, हे सभागृह होण्यासाठी जी जमीन लागणार होती त्या जमीन खरेदीसाठी माजी आमदार सुभाष बने व माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी त्यावेळी मदत केली याची आठवण सभागृहातील बसलेल्या मान्यवरांना शेखर निकम यांनी करून दिली तसेच माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी त्यांच्या आमदारकीच्या कारकीर्दीमध्ये कोयना भूकंप निधी मधून सभागृहाचे काम होण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता याची आठवण सुद्धा आमदार निकम यांनी करून दिली युवा उद्योजक सिद्धेश ब्रिद यांनी सभागृह कामासाठी निधी दिला व याही पुढे होणाऱ्या कामासाठी निधी द्यावा अशी विनंती शेखर निकम यांनी सिद्धेश ब्रिद यांना केली, शेखर निकम यांनी आपल्या मनोगतातून बोलताना सांगितले की “मी आमदार आहे म्हणून जो निधी उपलब्ध करून दिला आहे हे माझे कर्तव्य आहे. पण जे काम होत आहे ते चांगल्या पद्धतीने व्हावे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे या सभागृहामध्ये समाजातील सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी एक हक्काचे ठिकाण व इतर चांगले सांस्कृतिक कार्यक्रमासाठी करावा तसेच सभागृहाचे पावित्र्य जोपासावे” अशी समाज बांधवांना विनंती केली, अशा अनेक मुद्द्यांवर आमदार शेखर निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आमदार शेखर निकम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित मान्यवर रमेश राणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की “आमदार शेखर निकम यांच्या सारखा मी माझ्या तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्ती मध्ये असा आमदार लोकप्रतिनिधी पाहिला नाही अशा माणसाच्या पाठी आपण सर्व समाज बांधव पाठीशी राहून २०२४ चा चिपळूण संगमेश्वर विधानसभा निवडणुकीमध्ये परत पुन्हा एकदा भरघोस मताधिक्यांनी आमदार शेखर निकम यांना निवडून द्याल याची मला पूर्ण खात्री आहे. तसेच उपस्थित प्रमुख मान्यवर राजेंद्र सुर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमदार शेखर निकम हे सर्व समाज बांधवांना एकत्रित घेऊन सर्व समाजाला समान न्याय देणारे व्यक्तिमत्व आहे. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघा साठी लाभलेले आमदार शेखर निकम हे विकास पुरुष आहेत अशा विकास कामे करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला आपण सर्वांनी साथ देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे”
या कार्यक्रमास उपस्थित रमेश राणे (चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राध्यक्ष), राजेंद्र सुर्वे (रत्नागिरी जिल्हा बँक संचालक), दत्ताराम शेळके (अध्यक्ष), पूजा बोथरे (सरपंच), अनुप जाधव (उपसरपंच), तुकाराम येडगे ( जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी कॅांग्रेस तथा विश्वस्त जय मल्हार धनगर समाज सेवा संस्था ) विठोबा फोंडे, संतोष येडगे, बबन झोरे, अनंत कोकरे, सुरेश खरात, निलेश कदम(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक चिपळूण तालुकाध्यक्ष), अमित जाधव(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक संगमेश्वर उपतालुकाध्यक्ष), सचिन साडविलकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष), सिकंदर चिपळूणकर, प्रकाश पांढरे, सुनील बोंडेकर, अभिजीत शेळके, शिवराम शेळके, सुरेश बावदाने, लक्ष्मण झोरे, शांताराम शेळके, स्मिता बावदाने, लक्ष्मण येडगे आदी मान्यवर उपस्थित होते.



