आपला जिल्हा

आमदार चषक २०२४ भव्य जिल्हास्तरीय नमन स्पर्धेचे आयोजन

चिपळूण - विलास गुरव

चिपळूण – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिपळूण, सांस्कृतिक चित्रपट व कला विभाग आणि राधा गोविंद फाउंडेशन सावर्डे (ता.चिपळूण) यांच्या वतीने कोकणच्या पारंपारिक लोककलेचा स्तर उंचावण्यासाठी तसेच लोककलावंतांना प्रोत्साहित करण्यासाठी आमदार चषक २०२४ भव्य जिल्हास्तरीय नमन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिपळूण, सांस्कृतिक चित्रपट व कला विभाग आणि राधा गोविंद फाउंडेशन सावर्डे (ता.चिपळूण) यांच्या वतीने कोकणच्या पारंपारिक लोककलेचा स्तर उंचावण्यासाठी तसेच लोककलावंतांना प्रोत्साहित करण्यासाठी आमदार चषक २०२४ भव्य जिल्हास्तरीय नमन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा सोमवार दि. ११ व मंगळवार दि. १२ रोजी असे दोन दिवस चालणार आहे.

सदर स्पर्धेचे उद्घाटन सोमवार दि. ११ रोजी सायं. ७ वा. होणार आहे. यावेळी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत बाबाजीराव जाधव (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रत्नागिरी), किरण उर्फ भैय्याशेठ सामंत (सिंधू रत्न समिती सदस्य उद्योजक, रत्नागिरी), नितीन उर्फ अबुशेठ ठसाळे (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चिपळूण), राजेन्द्रकुमार पोमेडकर (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, संगमेश्वर), असित रेडीज (चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, सांस्कृतिक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. बक्षीस वितरण सोहळा हास्य जत्रा फेम मराठी अभिनेते प्रभाकर मोरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

आमदार शेखर निकम यांनी नेहमीच कोकणवासीयांच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. त्यात कोकणवासीयांच्या नमन खेळातील कलाकारांना शासकीय मानधन मिळावे यासाठी त्यांनी नागपूर अधिवेशनात मागणी देखील केली होती. त्यामुळे नमन स्पर्धेचे आयोजन म्हटल्यावर त्यांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.

सदर स्पर्धा सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डे ता.चिपळूण येथे संपन्न होणार असून सर्व कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button