आपला जिल्हा

चिपळूणमधील सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात रक्षाबंधन व वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न

चिपळूण- सहयाद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) ता. चिपळूण या प्राथमिक विद्यालयात रक्षाबंधन व वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला अतिशय मंगलमय व आनंदी वातावरणात प्रत्येक वर्गात रक्षाबंधन झाले. रक्षाबंधनासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या वापरण्यात आल्या. प्रत्येक वर्गात रक्षाबंधनाची गाणी मंगलमय सुरात लावण्यात आली होती. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येवून विद्यार्थी प्रतिनिधी कु. वेदांत महाडीक याच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष आपले मित्र, पर्यावरणाचा समतोल राखूया अशा विविध घोषणा देत शाळेच्या परिसरातील वृक्षाची पूजा करून विद्यार्थ्यांनी खास तयार केलेली चांद्रयान ३ ची प्रतिकृती असलेली मोठी राखी वृक्षाला बांधून वृक्षरक्षाबंधन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी पालक शिक्षक संघाच्या सदस्या सौ. वीणा भोसले उपस्थित होत्या. शाळेच्या शिक्षिका सौ. माधुरी खताळ यांनी रक्षाबंधन व वृक्षरक्षाबंधन याविषयी सविस्तर माहिती सांगितली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ, शिक्षिका सौ. मनिषा कांबळी, सौ. रश्मी राजेशिर्के, श्री. संदेश सावंत, सौ. अपूर्वा शिंदे, सौ. विनया नटे, श्रीम. वृषाली राणे, श्रीम. अर्चना देशमुख, सौ. रूपाली खरात, श्रीम. ज्योती चाळके, श्रीम. वर्षा सकपाळ, सौ. शितल पाटील, सौ. माधुरी खताळ, सौ. स्वरा भुरण यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button