आपला जिल्हा

राष्ट्रवादी महीला सेल चा एक धागा मायेचा उपक्रम राबत पोलिस ठाण्यात रक्षाबंधन ; प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर यांचा पुढाकार.

चिपळूण – आज एक धागा मायेचा अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिपळूण येथील महिला कार्यकारिणीच्या सर्व महिलांनी एकत्र येऊन जे पोलिस अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस आपल्या सर्वांचे रक्षण करतात.महिलांचे खास रक्षण करतात,त्यांच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करत असतात त्या सर्व पोलिस बांधवांना सामाजिक जाणिवेचे भान ठेऊन आज रक्षाबंधनाचा खास कार्यक्रम चिपळूण पोलिस स्टेशन येथे करण्यात आला.पोलिस स्टेशन चे उपविभागीय पोलिस अधिकारी राजमाने ,पोलिस निरीक्षक शिंदे ,सर्व पोलिस बांधव – पोलिस भगिनी यांना राखी बांधण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर, माजी नगराध्यक्ष रीहाना बिजले,मा.नगरसेविका आदिती देशपांडे,मा.नगरसेविका शिवानी पवार ,मा.नगरसेविका वर्षा जागुष्टे, डॉ जलश्री चाळके,अर्चना ठसाळे,कोमल भोसले,पूनम भोजने,संजना पवार अशा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्या उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button