आपला जिल्हा

तुकाराम येडगे यांना राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यकारणीत स्थान ; जिल्हा सरचिटणीस पदी निवड

संगमेश्वर – तालुक्यातील येडगेवाडीचे सुपुत्र तुकाराम येडगे यांना दि.२६ अॅागस्ट २०२३ रोजीच्या राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीला बोलावून त्या बैठकीत जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली यावेळी महीला बालकल्याण मंत्री ना.आदीती तटकरे आणि आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले.

तुकाराम येडगे यांनी जिल्हा नियोजन समितीत काम केले असून त्यांनी राजिवली ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच म्हणून ही उत्तमरित्या काम केले आहे. त्यांचा प्रशासनातील अनुभव लक्षात घेवून चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी त्यांना पक्षात काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संघटेनेचे काम करुन संघटना तळागाळात पोहचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी तुकाराम येडगे यांनी सांगितले.

संगमेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांमधील विविध कामांसाठी आपण आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करुन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून आपल्या प्रयत्नांना यश येईल असा विश्वास यावेळी तुकाराम येडगे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button