आपला जिल्हा

फोटोफेअर 2023 च्या आयोजनाने जागतिक छायाचित्रणदिन उत्साहात साजरा ; आमदार शेखरजी निकम यांनी केले फोटोग्राफर्सचे विशेष कौतुक

चिपळूण- रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन व चिपळूण तालुका फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे आज १७ ऑगस्ट रोजी, चिपळूण कापसाळ येथील लक्ष्मीबाई माटे सभागृहात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फोटोफेअर 2023 चे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व फोटोग्राफर बांधवांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी मा.आ. शेखरजी निकम, चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. प्रसादजी शिंगटे यांनी केले. दीप प्रज्वलन व कॅमेरा पूजन झाल्यावर कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्घाटनप्रसंगी शेखर सरांनी फोटोग्राफर व त्यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. आपल्या मनोगत ते म्हणाले की, मोबाईलवर फोटो काढणे आणि फोटोग्राफरने कॅमेऱ्याद्वारे फोटो काढणे यात मोठा फरक आहे. फोटोग्राफर होण्यासाठी तुमच्या अंगी प्रचंड पेशन्स हवेत, यासाठी खुप मेहनत करण्याची तयारी लागते.

फोटोफेअरमध्ये विविध प्रकारचे अल्बम, फ्रेम्स, सॉफ्टवेअर्स आणि फोटोसंबंधित साहित्याची विक्री, तसेच यासंबंधित माहिती देणारे वेगवेगळे स्टॉल्स हे फोटोग्राफर्सचे आकर्षण ठरले. याचबरोबर मुंबईचे नामवंत परीक्षक मा. परागजी शिंदे सरांची कार्यशाळा विशेष उल्लेखनीय ठरली. फोटोफेअरमध्ये संजय शिंदे आणि कांचन मालगुंडकर यांनी शेखर सरांचे स्वागत केले. श्री. गुरु चौगुले व श्री. प्रवीण पाटोळे यांनी श्री. प्रसाद शिंगटे सरांचे स्वागत केले. श्री.पराग शिंदे सरांचे स्वागत मा.आ. शेखरसर निकम यांनी केले. यानंतर सर्व तालुका प्रतिनिधींचे स्वागत चिपळूण तालुका असोसिएशन सदस्यांनी केले. स्टॉल धरकांचे स्वागत सर्व सदस्यांनी केले. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व फोटोग्राफर्स बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button