आपला जिल्हा

उन्हाळे गंगा तीर्थक्षेत्राच्या सोयीसुविधांबाबत पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार डॉ.राजन साळवी यांची चर्चा

राजापूर – पर्यटनदृष्ट्या विकास आणि सोयीसुविधांच्या उभारणीच्या अनुषंगाने आमदार राजन साळवी यांच्या मागणीनुसार राज्याच्या पर्यटन विभागाचे सचिव हनुमंत हेडे, उप अभियंता ऋषीकेश नारकर यांनी आज शहरानजीकच्या उन्हाळे येथील प्रसिद्ध गंगातीर्थक्षेत्रासह गरम पाण्याचा झरा या ठिकाणी भेट दिली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर गरम पाण्याच्या झर्‍याच्या ठिकाणी संरक्षण भिंत आणि चेजिंग रूम उभारणीसाठी तात्काळ निधी देण्याचे आश्‍वासित केले. यावेळी त्यांनी आमदार श्री. साळवी यांच्या उपस्थितीमध्ये पर्यटन निधीअंतर्गंत गंगातीर्थ विकासासाठी उपलब्ध झालेल्या निधीच्या विनियोगासंबंधित बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चाही केली.

यावेळी उन्हाळे येथील ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष
शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश कुवळेकर, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, उपतालुका प्रमुख रामचंद्र सर्वणकर,कोदवली विभागप्रमुख संतोष हातणकर, नरेश दुधवडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. दुधाडे साहेब,अभियंता चिंचोळे साहेब,आमदार राजन साळवी यांचे स्वीय सहाययक रोमेश नार्वेकर, केळवली युवासेना युवासेना विभाग अधिकारी अमित मोंडे, सरपंच नेत्रा पुजारी, पोलिस पाटील प्रकाश पुजारे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रामचंद्र बाईत, नंदकुमार पुजारी, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कणेरे, वैष्णवी गुरव, अमित मोंडे, मंगेश तिर्लोटकर, महादेव पळसमकर, संदेश नवाळे, ग्रामसेवक श्रीमती घुमे, आदी उपस्थित होते.

उन्हाळे तीर्थक्षेत्री गंगामाईचे अवचितपणे होणारे आगमन आणि निर्गमनाचे कोडे विज्ञानालाही आव्हान ठरलेले आहे. गंगामाईच्या वास्तव्याच्या काळामध्ये राज्यासह राज्याबाहेरील विविध राज्यांमधील लाखोंच्या संख्येने भाविक गंगातीर्थक्षेत्री भेटी देतात. अर्जुना नदीच्या काठावरील बारमाही वाहणारा गरम पाण्याचा झरा ठिकाणालाही पर्यटक भेटी देतात. त्यामुळे ही दोन्ही ठिकाणे पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याच्यादृष्टीने आमदार श्री. साळवी यांच्या सुचनेनुसार पर्यटन विभागाचे सचिव श्री. हेडे आणि श्री. नारकर यांनी आज या ठिकाणी भेट देवून सोयीसुविधांच्या उभारणीच्या अनुषंगाने पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायतीचे पदधिकारी आणि ग्रामस्थांनी सोयीसुविधांची उभारणी करण्याच्या अनुषंगाने विविध सूचना मांडल्या. या सूचनांसह गंगातीर्थाच्या प्रलंबित असलेल्या विकासकामांसंबंधित आमदार श्री. साळवी यांच्या उपस्थितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत सविस्तर आढावा घेण्यात आला. रखडलेली ही विकासकामे तात्काळ होण्याच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला यावेळी देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button