आपला जिल्हा

संगमेश्वर प्रेस क्लब आयोजित देशभक्तीपर गायन स्पर्धेत दादासाहेब सरफरे विद्यालयाच्या लहान व मोठ्या गटाने पटकावला प्रथम क्रमांक

देवरुख – संगमेश्वर तालुका प्रेस क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या निमंत्रित शाळांच्या देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत दादासाहेब सरफरे विद्यालयाने लहान व मोठ्या गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे या स्पर्धेला शाळांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

ही स्पर्धा रविवारी देवरुख येथील पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहामध्ये घेण्यात आली. स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने यांच्या हस्ते करण्यात आला. शुभारंभ प्रसंगी रोहन बने म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान निर्माण होणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या प्रेस क्लबने राबवलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे म्हटले. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक संभाजी आंब्रे यांनी प्रेस क्लब ने अशा प्रकारे उपक्रम राबवल्याबद्दल कौतुक केले. तर प्रेस क्लबचे अध्यक्ष सचिन मोहिते म्हणाले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये मनामध्ये देशाभिमान निर्माण व्हावा याकरिता हा उपक्रम घेण्यात आल्याचे स्पष्ट करत याकरिता सर्वच पत्रकारांनी मेहनत घेतल्याचे सांगितले.

बक्षीस वितरणा वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री रवींद्र माने म्हणाले स्वातंत्र्य संग्रामासाठी ज्यांनी बलिदान दिले अशांचे स्मरण करणे आणि सीमेवर लढणाऱ्यांप्रती कृतज्ञता बाळगणे हे आपले कर्तव्य आहे आणि यांचे स्मरण करण्याकरिता या रेस्क्यूबने घेतलेला देशभक्तीपर समूहगीत गाण्याचा कार्यक्रम हा अभिमानास्पद असल्याची त्यांनी स्पष्ट केली.

या स्पर्धेत लहान गटात दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी प्रथम, मिनाताई ठाकरे विद्यालय साडवली द्बितीय,पाध्ये इंग्लीश स्कूल देवरुख तृतीय तर उत्तेजनार्थ म्हणुन देवरुख शाळा नं.१ ला रोख रक्कम पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याबरोबरच
मोठ्या गटात दादासाहेब सरफरे प्रथम, पाध्ये इंग्लीश स्कुल देवरुख व्दितीय, मिनाताई ठाकरे विद्यालय साडवली तृतीय आणि पी.एस.बने इंटरनॅशनल स्कुल ला उत्तेजनार्थ अशी रोख रक्कम पारितोषिक व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.परीक्षक म्हणुन ऍड गिरीश गानु व संगीत अलंकार निहाली गद्रे यांनी काम पाहिले.

बक्षिस वितरण प्रसंगी माजी राज्यमंञी रवींद्र माने, पोलीस निरिक्षक पोवार, सचिन मोहिते, गिरीश गानु, निहाली गद्रे, संभाजी आंब्रे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, सागर मुरुडकर, निलेश जाधव, सागर मुळ्ये, मकरंद सुर्वे, सुरेश करंडे, संतोष पोटफोडे, दीपक भोसले मिथुन लिंगायत पर्णिका सावंत आदि पत्रकार उपस्थित होते.स्पर्धेचे सुञसंचालन प्रमोद हर्डीकर यांनी केले. मुंबई विद्यापीठात युवा महोत्सवात देवरुख कॉलेजची अंध विद्यार्थीने कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल तिला कार्यक्रमादरम्यान गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button