आपला जिल्हा

चिपळूण तालुक्यातील कालुस्ते खुर्द, मजरेकाशी गावातील जेटी आणि संरक्षण भिंतीच्या कामाला मिळणार मंजुरी.

चिपळूण प्रतिनिधी - ओंकार रेळेकर

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील कालुस्ते खुर्द हे गाव गोवळकोट समोर असून वाशिष्ठी नदीकिनारी वसलेले आहे. २०२१ च्या पुराच्या पाण्यात कालुस्ते गावाला देखील पाण्याने वेधले होते. त्यामुळे तेथील लोकांना होणारा त्रास लक्षात घेऊन आपल्या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार श्शेखर निकम यांनी काही दिवसांपूर्वी एक निवेदन महाराष्ट्र राज्याचे बंदर विकास मंत्री संजय बनसोडे यांना दिले. हे निवेदन देण्यासाठी आमदार यांचे विश्वासू सहकारी तसेच चिपळूण मधील मर्चंट नेव्ही ऑफिसर इम्रानभाई कोंडकरी यांनी स्वतःहून पाठपुरावा केला आणि ते निवेदन स्वतः इम्रानभाई कोंडकरी आणि त्यांचे मित्रपरिवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी लोकप्रिय आमदार शेखरजी निकम सर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुबई मंत्रालयात बंदर विकास मंत्री यांना दिले. मंत्र्यांनी देखील त्या निवेदनाची तातडीने दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी (महा. सागरी मंडळ) यांना सूचना दिल्या व लगेचच ते निवेदन महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिकराव गुरसाल यांच्या कडे स्वतः मर्चंट नेव्ही ऑफिसर इम्रानभाई कोंडकरी यांनी जमा करून घेतले आहे. त्यावेळी इम्रानभाई कोंडकरी यांनी कोकणातील इतर काही बंदर विकास कामाबद्दल देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा केली असून वरील कामाला लवकरच अंतिम मंजुरी देण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहे.

येत्या काही दिवसात कालुस्ते खुर्द, मजरेकशी गावाचा चेहरा बदलणार असल्याने तेथील स्थानिकांनी समाधान व्यक्त केले असून आमदार शेखर निकम यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button