आरोग्य व शिक्षण

ताडदेव मध्ये शिवसेनेच्या वतीने विद्यार्थी गुण गौरव समरंभ संपन्न.

मुबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १४ तर्फे जनता केंद्र, ताडदेव येथे विद्यार्थी *गुण गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.

विभाग प्रमुख दिलीप नाईक यांच्‍या हस्ते भेट वस्‍तु व *सन्मानीय मुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची सही असलेलं प्रमानपत्र* देऊन गुणवंत विद्यार्त्यांचा गौरव करण्यात आला. १०वी ला ९९.४०% मिळवून दक्षिण मुंबईतून प्रथम आलेली विद्यार्थिनी चैताली दिपक राणेला लॅपटॉप* भेट देऊन तसेच १२वी ला ९१% मिळून *प्रभागातून प्रथम आलेली विद्यार्थिनी मानसी अशोक सांगळेला टॅब  भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला. ह्या कार्यक्रमात एकूण *१९० गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला, महिला विभाग प्रमुख नीलम पवार, विधानसभा संघटक, उमेश वळसे, संध्या डुंबरे, विधानसभा समन्वयक सुवर्णा मसूरकर, उपविभाग प्रमुख संतोष सकपाळ, मेघा ढापले, पद्मजा वेदपाठक, शाखाप्रमुख संतोष सावंत, स्वाती राणे, युवासेनेचे शाखा अधिकारी सौरभ दुधावडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
विधानसभा समन्वयक सुदीप नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. शाखाप्रमुख संतोष घुगे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button