आपला जिल्हा

पाणी नसलेल्या ठिकाणची विहीर रद्द करुन येडगेवाडीला मुबलक पाणी देणारी विहीर करावी ; येडगेवाडीकरांचे रत्नागिरी जिल्हा परीषद प्रशासनाला बहुसंख्य सह्यांचे निवेदन.

संगमेश्वर – तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना मंजूर झाली आहे. येथील योजनेच्या विहारीचे काम येडगेवाडी येथील तिवटी या ठिकाणी सुरु करण्यात आले मात्र या ठिकाणी येडगेवाडीला पुरेल इतके पाणी उपलब्ध नसल्याने या ठिकाणची विहीर रद्द करुन यंपुर्ण येडगेवाडीला पुरेल इतक्या क्षनतेची विहीर करावी अशी मागणी करणा-या १५० पेक्षा अधिक ग्रामस्थांनी आपल्या सह्यांचे निवेदन रत्नागिरी जिल्हा परीषद प्रशासनाला दिले आहे.

येडगेवाडीची सन २०११ च्या जनगणनेनुसार ५०९ लोकसंख्या आहे तर २०५३ ची संकल्पीत लोकसंख्या ही ९५९ होते येडगेवाडीला प्रतिदिनी ६३ हजार लिटर पाण्याची मागणी आहे. मात्र सध्या येडगेवाडी तिवटी या ठिकाणी विहीर खोदण्यात आली आहे त्या विहीरीत ३ एप्रिल २०२४ ला तत्कालीन उपअभियंता श्री.अनिनाश जाधव यांनी केलेल्या ( Yeild Test ) मध्ये प्रतिदिनी ३५०० लिटर पाणी येत अयल्याचे पत्र कनिष्ठ भूवैज्ञानिक, रत्नागिरी यांना पाठविलेले आहे. सदरचे पाणी येडगेवाडीसाठी पुरेसे नाही. येडगेवाडीची भविष्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेवून राजिवली ग्रामपंचायत सरपंच यांनी दि.१३ मार्च २०२४ रोजी आणि चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. शेखर निकम यांनी विहीरीची जागा बदलण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे.

रत्नागिरी जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार यांनी स्वत: ५ एप्रिल २०२४ रोजी येडगेवाडी या ठिकाणी नळपाणी योजना कामाची पाहणी केली असता ग्रामीण पुरवठा उपअभियंता आर.एल लठाड यांना एप्रिल अखेरपर्यंत तिवटी येथील विहीरीची खोली आणि रुंदी वाढवल्यानंतर पाणी पातळी ( Yeild Test ) घेवून तसा अहवाल पाठवण्याचे आदेश दिलेले होते. मात्र सीईओं चे आदेश पायदळी तुडवत उप अभियंता आर.एल लठाड यांनी जिल्हा परीषद मुख कार्यकारी अधिकारी यांचे आदेशाला फाट्यावर मारत तिवटी येथील विहीरीतील पाण्याची ( Yeil Test ) घेण्याचे टाळले. ग्रामीण पाणी पुरवठा उप अभियंता आर.एल लठाड हे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती कुमार पूजार यांचे आदेशच पाळत नसतील तर जनतेचे काय ऐकणार असा सवाल ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. तर या उप अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करुन चुकीच्या पध्दतीने खोदकाम केलेली तिवटीतील विहीर रद्द करुन मुबलक पाणी मिळेल अशा ठिकाणी नवीन विहीर तयार करुन त्या विहीरवरुन नळपाणी योजना करण्याची मागणी केली आहे.

येडगेवाडी नळपाणी योजना कामाच्या मुळ अंदाजपत्रकात उप अभियंता यांनी पाचांबे गायकवाडवाडी या ठिकाणची लांबी समाविष्ट केली होती या मार्गिकेसाठी DI पाईप घेतले आहेत तर पाचांबे गायकवाडवाडी या ठिकाणी विहीरीची जागा निश्चित करण्यात आली होती  योजनेचा सर्व खर्च विचारात घेवून अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मुळ अंदाजपत्रकाला बगल देण्यात आली आहे. हे काम सुरु करतानाच मुळ अंदाजपत्रकानुसार झाले नाही ते बेकायदेशीर सुरु करण्यात आले. मुळ अंदाजपत्रकानुसार काम केले तर कामात पैसै उरणार नाहीत आणि त्यातून काही मंडळींना आर्थिक फायदा होणार नाही म्हणूनच वाडीतच जवळच्या अंतरात विहीर करुन पाईपलाईन च्या पैशांची बचत करुन दिड कोटीचे काम फक्त ६० लाखात आटोपून उर्वरीत पैशांमध्ये इतर छोटी मोठी कामे दाखवून भ्रष्टाचार करता येईल यासाठी सर्व अट्टाहास सुरु आहे. मात्र आम्ही ही योजना मुळ अंदाजपत्रानुसार करण्यासाठी आग्रही आहोत.या कामात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होवून देणार नाही येडगेवाडी नळपाणी योजनेचे काम करताना मुळ अंदाजपत्रकानुसारच करण्यात यावे ही आमची मागणी आहे.

– संतोष येडगे
माजी उपसरपंच – ग्रा. पं राजीवली

कुटगिरी येडगेवाडी नळपाणी योजना तिवटी येथील नव्याने खोदकाम केलेल्या विहीरीतून येडगेवाडीची तहान भागणार नाही म्हणून येडगेवाडी ग्रामस्थांनी जिल्हा परीषद प्रशासनाला सह्यांचे निवेदन देण्यासाठी पुढाकार घेत सह्यांचा टप्पा पुर्ण करत असताना येडगेवाडीतील यशवंत गोविंद येडगे यांनी आमची दिशाभूल करुन उद्या ग्रामसभा आहे त्यासाठी तुमच्या सह्या हव्या आहेत असे खोटे सांगून तिवटी येथील विहीर समर्थनार्थ सह्या घेतल्या त्या आमच्या सह्या जिल्हा परीषद प्रशायनाने ग्राह्य धरु नयेत तिवटी येथील विहिरीतील पाणी संपुर्ण येडगेवाडीची तहान भागवणार नाही या मतावर मी ठाम आहे

– बारकू जानू येडगे
   ⁠ग्रामस्थ येडगेवाडी

Related Articles

Leave a Reply

Back to top button