आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जनशताब्दी सुपरफास्ट एक्स्प्रेसला राजापूरला थांबा मिळावा ; राष्ट्रवादीचे युवानेते अजीत यशवंतराव यांची निवेदनाव्दारे मागणी
देवरुख - सुरेश सप्रे

जनशताब्दी सुपरफास्ट एक्स्प्रेसला राजापूरला थांबा मिळावा ; राष्ट्रवादीचे युवानेते अजीत यशवंतराव यांची निवेदनाव्दारे मागणी
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट मडगाव-जनशताब्दी एक्सप्रेसला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर रेल्वे स्टेशनला थांबा मिळावा याकरिता आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे( अजीत पवार गट)नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी भेट घेवून निवेदन देत मागणी केली आहे.
यावर सकारात्मक चर्चा केली. यावेळी मंत्री महोदयांनी राजापूर रेल्वे स्टेशनला थांबा देण्याची मागणीवर सकारात्मकता दाखवून थांबा देणेसाठी लौकरच कोकण रेल्वे अधिकारीवर्गाला बैठक आयोजित करणेचे आदेश दीले. यावेळी चिपळूणचे आम. शेखर निकम उपस्थित होते.



