आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

संगमेश्वर तालुक्यात नर्सरी मधून फुलबागा फुलविण्याचा प्रयत्न ; लोवले येथील शुभम दोरखडे यांचा अभिनव उपक्रम

संगमेश्वर - सचिन यादव

नर्सरी म्हटल की आपल्या समोर उभे राहते ते आंबा काजूची नर्सरी पण फुलझाडे सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनातील भाग आहे. मग ती सकाळी देव्हाऱ्यात पूजेला जास्वंदीची फुल असो नाहीतर केसात मालायला मोगऱ्याची फुल. प्रत्येकाला आपल्या घरासमोर एक छोटी का होईना बाग असतेच, त्यामध्ये गुलाब जास्वंद, चाफा, जाई जुई यासारखी अनेक झाडे लावली जातात. काहीजण तर घरा भोवती गार्डन च तयार करतात तर फ्लॅट सिस्टीम मध्ये तर ऑक्सिजन व सुशोभीकरणासाठी घरात झाडे ठेवली जातात फुलझाडे सुशोभिकान बरोबरच मन स्वच्छ व तणावमुक्त करतात. तर काही फुलझाडां मध्ये औषधी गुण सुध्दा आहेत

नर्सरी चालू करायचं स्वप्नं बहुतांश कृषी पदवीधराच असतच, त्यात माझी डिग्री बी.एससी. होर्टिकल्चर ( बागायती) असल्यामुळे चार वर्षाच्या डिग्री मध्ये बागायती, landscape, याचीच आवड निर्माण झाली . डिग्री झाल्यावर बरेच वेळा वाटत होते फुलझाडांची नर्सरी चालू करूया . आसपासच्या परिसरात तशी नर्सरी ही नव्हती, पण ‘आपण पडलो ग्रामीण भागात आपल्याकडील रोप कोण घेणार, लोकांची प्रतिक्रिया कशी असेल ‘ हे मनात भेडसावत राहायचं. त्यातूनच landscape ( बागकाम ) ची कामे येताच होती. शेवटी 21 मे रोजी छोटी का होईना फुलझाडे गार्डन नर्सरी चालू केली.

त्यात आता सर्व प्रकारचे गार्डन फुलझाडे आहेत. त्याचबरोबर बागायतदारांच्या मागणीनुसार साहिल व स्मित या मित्रांच्या मदतीने नवीन बाग लावणे, त्याचे व्यवस्थापन, खते घालने, बागेच प्रूनिंग करणे याची कामे सुद्धा मी करत आहे. त्याचा बागायतदार कडून चांगला प्रतिसाद आहे

या सर्व कामामध्ये कोणाचा एकट्याचे योगदान नाहीं हितचिंतक व्यक्ती सकारात्मक विचार सांगत केले त्याप्रमाणे एक एक पाऊल पुढे टाकत गेलो. यामध्ये मित्रांची खुप मोलाची साथ लाभली, आई ,वडील, बहिणी यांची भक्कम साथ होती म्हणून त्यांच्य पाठबळ तर आहेच, पण काही हितचिंतकांनी मार्ग दाखवणारे होते यांचे सुध्दा योगदान आहे.

आर्थिक बाजू सांभाळताना खुप अडचणी आल्या गतवर्षी शेती केल्यामुळे थोडाफार झालेला मोबदल्यात नर्सरी चालू केली. शेतीतून वापरलेला मोबदला हा माझा एकट्याच नव्हता त्यात आईवडिलांचे सुद्धा कष्ट होते, नर्सरी ला प्रतिसाद नाही मिळाला तर सर्वच नुकसान व्हायचे याची मनात भीती होती. पण सर्वांच्या मदतीने आज यशस्वीरीत्या निर्सरी चालू केली आहे. उत्तम प्रकारचे रोप मिळत असल्यामुळे ग्राहकांमध्ये एक समाधानाचे वातावरण आहे .

Related Articles

Leave a Reply

Back to top button