आपला जिल्हा

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आर सी काळे विद्यालयाची कु.भार्गवी कानडे प्राथमिक गटात प्रथम

चिपळूण – येथील पूज्य गांधी प्रतिष्ठान यांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध गटात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. त्या स्पर्धेत प्राथमिक गटात (इयत्ता पाचवी ते सातवी) आर. सी. काळे माध्यमिक विद्यालय पेढे परशुरामची विद्यार्थिनी कुमारी भार्गवी शंकर कानडे हिचा प्रथम क्रमांक आला आहे.

आज महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने चिपळूण शहरातील गांधारेश्वर येथील महात्मा गांधी स्मृती स्थळाजवळ गांधी जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यावेळी कुमारी भार्गवी कानडे हिला सुरेश तांबट यांच्या हस्ते प्रथम क्रमांक आल्याबद्दल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाला गांधी विचारांचे अभ्यासक राजेंद्र बहाळकर, चिपळूणचे डी वाय एस पी राजेंद्र राजमाने , नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे , गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक विनायक होमकळस,सुनील खेडेकर, चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ पूजा निकम, सावर्डे हायस्कूलचे मुख्याध्यापक वारे सर, सती हायस्कूलचे मुख्याध्यापक वरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी विविध गटातील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते सादर केली. तसेच अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

भार्गवी कानडे हिने मिळवलेल्या या यशाबद्दल भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अभय सहस्रबुद्धे , सरचिटणीस सुनील गमरे, मुख्याध्यापक मोहन शिंदे, पर्यवेक्षक विनायक माळी व इतर सर्व संस्था संचालकांनी, शिक्षक – कर्मचाऱ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button