कुंदा तुकाराम येडगे यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती

संगमेश्वर – तालुक्यातील आरवलीतील येडगे सेवा केंद्राच्या संचालिका कुंदा तुकाराम येडगे यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी कुंदा यांच्या नावाची शिफारस केली होती त्यांच्या शिफारसीनुसार पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशाने रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी कुंदा येडगे यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले आहे.
कुंदा तुकाराम येडगे यांनी राजिवली ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केल्याचा अनुभव आहे तर सध्या त्या आरवलीत येडगे सेवा केंद्राच्या संचालिका असून येडगे सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेचे विविध दाखले काढण्याचे काम सुरु आहे. विविध दाखले आणि कागदपत्रांच्या प्रमाणीत ( Attested ) प्रत आवश्यक असते त्यामुळे त्यांची नियुक्ती येथील जनतेसाठी लाभदायी ठरणार आहे. त्यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्तीमुळे आरवलीतील जनतेला दाखले आणि त्यासाठी लागणा-या प्रमाणीत प्रत ( Attested ) एकाच ठिकाणी सेवा उपलब्ध झाली आहे. कुंदा येडगे यांच्या नियुक्तीनंतर राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी चे जिल्हा सरचिटणीस तुकाराम येडगे यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार शेखर निकम यांचे आभार मानले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी माझ्यावर विश्वास दाखवून माझी विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती केली आहे त्यांचा विश्वास सार्थकी ठरवणार असून जनतेची प्रमाणित ( Attested ) कामे पारदर्शक पणाने करेल
– कुंदा तुकाराम येडगे.
– माजी सदस्य – ग्रामपंचायत राजिवली ता. संगमेश्वर
– संचालिका – येडगे सेवा केंद्र, आरवली ता. संगमेश्वर



