सावर्डेचा हॉलीबॉल संघ विभागस्तरावर खेळण्यासाठी रवाना आमदार शेखर निकम यांनी दिल्या शुभेच्छा

चिपळूण – क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद,रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच फाटक हायस्कूल रत्नागिरी येथे संपन्न झाल्या.
या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत सह्याद्रि शिक्षण संस्थेचे गोविंदराव निकम माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेच्या 17 वर्षे वयोगट मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित करून विभागीय स्तरावर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रवाना झाला. याप्रसंगी आमदार शेखर निकम यांनी सांघिक कामगिरी करून आदर्श निर्माण करा असे आवाहन करून सर्व हॉलीबॉल खेळाडूंना विभाग स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या संघाला क्रीडाशिक्षक अमृत कडगावे रोहित गमरे यांचे मार्गदर्शन लाभले त्याच सोबत विशाल सुर्वे किरण राठोड यांचेही सहकार्य मिळाले.यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, अध्यक्ष बाबासाहेब भुवड, शालेय समितीचे चेअरमन व संचालक शांताराम खानविलकर, सर्व संस्था पदाधिकारी,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, विद्यालयाचे प्राचर्य राजेंद्र वारे,उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर,पालक,शिक्षक व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



