आपला जिल्हा

महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिका-यांना प्रेरणा मिळण्यासाच्या हेतूने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी; कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

मुंबई – कोल्हापूर जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत असताना जिल्हाधिकारी श्री.अमोल येडगे यांनी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी “पथदर्शी कार्यक्रम” हा उपक्रम राबवून नागरिकांना अधिक सुलभतेने सेवा पुरवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना प्राप्त यशा बद्दल राज्य शासनाकडून त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकारी श्री.अमोल येडगे यांनी संपूर्ण राज्यासाठी आदर्श प्रस्थापित केले आहे.यास्तव राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांना प्रेरणा मिळण्याच्या हेतूने सोमवार दि.२८ एप्रिल २०२५ रोजी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते अतिथीगृह, मुंबई या ठिकाणी यथोचित सन्मान होणार आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ जिल्हाधिकारी, एससीईआरटी’ पुणे च्या संचालक पदी आणि आता कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कामगिरीची दखल राज्य सरकारने घेवून त्यांच्या सन्मान होत असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button