आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

देवरूख महाविद्यालयात हर घर तिरंगा अभियानाचा शुभारंभ

देवरूख- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा उपक्रमाचा प्रारंभ आज १३ ऑगस्ट पासून करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या पटांगणावर देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह शिरीष फाटक यांनी ध्वजवंदन केले.

याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, भारतीय छात्र सेनेच्या नेव्ही विभागाचे प्रमुख प्रा.उदय भाटे यांच्यासह राष्ट्रीय छात्र सेनेच्या आर्मी व नेव्ही युनिटचे कॅडेट्स, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button