आपला जिल्हाक्राईम

संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखानीतील शेतक-याची पशुखाद्यासाठी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आरोपीला संगमेश्वर पोलिसांनी कर्नाटक मध्ये केली अटक

संगमेश्वर कुंभारखाणी बुद्रुक येथील शेतकऱ्याची पशुखाद्य कडबा कुटीसाठी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आरोपीला संगमेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.

संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिंदे आणि सचिन कामेरकर यांनी ही कामगिरी केली आहे.

गेल्या वर्षी सुनैना सुभाष सुर्वे यांची फसवणूक झाली होती. पशुखाद्य कडबा कुटीसाठी शेतकऱ्यांने 46 हजार रुपये भरूनही खाद्य मिळाले नव्हते. संशयित आरोपीचे नाव तमन्ना आनंद तिमापुर असे असून आरोपीला कर्नाटक मध्ये अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button