आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडी
खळबळजनक ! स्फोटकांनी भरलेला टँकर मुंबई – गोवा मार्गावर जात असल्याचा रत्नागिरी पोलिस कंट्रोल रुम ला फोन.

-
संगमेश्वर :- रत्नागिरी पोलीस कंट्रोल रूम येथे एका अज्ञात व्यक्तीने फोन करून स्फोटके भरलेला एक टॅकर मुंबई ते गोवा जात असल्याची माहीती दिली त्या माहीतीच्या आधारे रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्गावरील सर्वच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांनी नाकाबंदी केली. नाकाबंदीत संगमेश्वर पोलिसांना के.एच १९ अेडी ८५७१ ही संशयित गाडी आढळली आहे या प्रकरणी अधिक तपास संगमेश्वर पोलिस करत आहेत.
नाकाबंदीत आढळलेल्या टॅंकर मध्ये केमिकल युक्त पदार्थ असल्याचे दिसून आले आहे . संबंधित पदार्थ कोणता आहे हे रत्नागिरी आणि कोल्हापूर फॅारेन्सिक यांच्याकडून तपासला जावून नंतरच त्याबाबत निष्कर्ष काढला जावू शकतो असे प्राथमिक दृष्ट्या पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
स्फोटकांनी भरलेला टॅंकर मुंबई – गोवा महामार्गावरुन जात असल्याच्या बातमीने जिल्ह्यात खळबळ उडाली असली तरी जनतेने अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.



