माखजन – करजुवे प्रमुख जिल्हा मार्गावरील जुनाट वृक्ष धोकादायक

संगमेश्वर – तालुक्यातील माखजन-करजुवे या मुख्य रहदारीच्या मार्गावरील रामनवाडी नजीक असलेले जुनाट व पूर्ण सुकलेले वृक्ष धोकादायक स्थितीत उभे आहे. सद्यस्थितीत केंव्हाही कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. त्या अगोदर बांधकाम विभागाने तात्काळ तोडावेत अशी मागणी सद्या वाहन धारकासह ग्रामस्था मधून होत आहे.
मागील दोन वर्षापासून रस्त्याच्या दुतर्फा असलेलं महाकाय जुनाट वृक्ष सुकलेले आहेत. त्यांचे आयुर्मान संपुष्टात आले आहे. सद्या पाऊस सूरु राहिल्याने पावसाचे पाणी झाडामध्ये मुरले गेल्याने सद्या अधिकच धोकादायक ठरत आहेत. कुजलेल्या स्थितीत त्याच्या फांद्या, साली , झाडाचे तुकडे सतत रस्यावर वरून पडत आहेत. त्यामुळे खालून ये जा करणाऱ्या ग्रामस्थाना व वाहन धारकांना आपला जीव मुठीत घेऊन त्या खालून जावे लागत आहे.
सतत वरून पडणाऱ्या फांद्या व साली अनेकदा वाहनावर पडत आहे . मोठी झाडे वळण मार्गावर असल्याने रस्त्याच्या बाजूला झुकलेली आहेत. या मार्गावर अशी अनेक वृक्ष धोकादायक स्थितीत असून ती तात्काळ तोडून रस्ता प्रवासासाठी सुरक्षित करावा अशी मागणी जोर धरत आहे.



