कुणबी समाजाला सहकार्य करणार ; उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांची शिष्टमंडळाला ग्वाही

चिपळूण – कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणीसाठी निधी उपलब्ध व्हावा. तसेच समाजातील अन्य प्रश्नांसंदर्भात उद्योजक वसंत उदेग यांनी शिष्टमंडळासमवेत आ. शेखर निकम यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांची भेट घेतली. यावेळी ना. अजितदादा पवार यांनी कुणबी समाजाला सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
चिपळूण तालुक्यातील कुणबी समाजातील विद्यार्थांसाठी वसतिगृह आहे. मात्र, सध्या ते नादुरुत अवस्थेत आहे. या वसतिगृहासाठी शासकीय निधीसह समाजाच्या अन्य प्रश्नासंदर्भात मंगळवारी कुणबी समाजाचे नेते उद्योजक वसंत उदेग यांनी आ. शेखर निकम यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांची भेट घेतली. यावेळी अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ना. अजितदादा पवार यांनी उद्योजक वसंत उदेग यांच्याकडून समाजाच्या कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली. समाजाचे आणि देशाचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थी मग ते कोणत्याही समाजाचे असोत. आम्ही त्यासाठी सहकार्य करीत आहोत, असे सांगून आम्ही सहकार्य करू, असे आश्वासन यावेळी ना. अजितदादा पवार यांनी दिले.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी कुणबी समाजाच्या या पदाधिकाऱ्यांचे करीत असलेल्या कामाचे कौतुक केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चिपळूण- संगमेश्वर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रमेश राणे, कुणबी समाजाचे नेते विलास खेराडे आदी उपस्थित होते.



