आपला जिल्हा

लोकशाही दिन 3 ऑक्टोबर रोजी ; तालुकास्तरावर अर्ज सादर करावे – उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे

रत्नागिरी – जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे ऑक्टोबर 2023 च्या पहिल्या सोमवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने शासकीय सुट्टी असल्याने लोकशाही दिन मंगळवार 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत होणार आहे.

लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शुभांगी साठे यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button