आपला जिल्हा

राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. उल्का विश्वासराव यांनी केली ‘विधानसभा व्यवस्थापन समिती’ची घोषणा…

लांजा – भाजपा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. राजश्री (उल्का) विश्वासराव यांनी आज शासकीय विश्रामगृह लांजा येथे राजापूर विधानसभेच्या व्यवस्थापन समितीची घोषणा केली. यावेळी महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना कामकाजाचे स्वरूप समजावून सांगितले. तसेच ‘महाविजय २०२४’ मध्ये योगदान देत पुन्हा एकदा भारत देशाला वैभवसंपन्न करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन केले.

यावेळी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. राजश्री. विश्वासराव यांनी विधानसभा प्रभारी म्हणून श्री. कृष्णकांत (भाई) जठार यांच्यावर दायित्व सोपवले. भाई आपल्या सडेतोड व आक्रमक पक्ष कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. शिवाय त्यांना राजापूर विधानसभेतील जनमानसाची चांगली जाण असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. याशिवाय विधानसभा संयोजक म्हणून श्री. चंद्रकांत लिंगायत हे काम पहाणार आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात भाजपा कार्यकर्ते विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बूथवर, घरात, शेताच्या बांधावर, मजूर बांधवांना एकत्र करून पक्षाचा प्रचार करतील असे सौ. उल्का विश्वासराव म्हणाल्या.

विधानसभेत बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख तसेच बूथ वॉरीयर्स यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कामकाजाची पहाणी करण्यासाठी प्रदेश स्तरावरून पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून श्री. योगेश मुळे यांची निवड झाली आहे. पक्षाचा सोशल मिडिया सांभाळण्याची जबाबदारी श्री. संदेश गुरव, श्री. सुयोग तोडकरी व श्री. प्रताप मुरकर यांची राहील. मिडिया टीममध्ये श्री. जितेंद्र चव्हाण, श्री. स्वप्नील गोठणकर व श्री. संतोष कोत्रे तर कायदा (विधी) विभागाचे दायित्व ऍड. विलास कुवळेकर, ऍड. सुमंत वाघदरे आणि ऍड. सुशांत पवार यांच्यावर असणार आहे.

केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याची, त्यांचा लाभ मिळवून देणारी यंत्रणा उभारण्याची व येत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी श्री. अनिलकुमार करंगुटकर तसेच सौ. सुयोगा जठार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. प्रचार-प्रसार साहित्याबाबत आवश्यक निर्णय घेण्यासाठी श्री. संजय आयरे, सरळ ऍप प्रणाली जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी श्री. अमित केतकर तर विधानसभा वॉररूमसाठी कु. अचला विश्वासराव यांच्याकडे दायित्व असणार आहे. अनुसूचित जाती विभाग श्री. मारुती कांबळे, अनुसूचित जमाती विभाग श्री. शिवा हिलीम, इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) विभाग श्री. सदानंद कांबळे तर भटके-विमुक्त जाती जमाती विभाग श्री. महेंद्र शेडे सांभाळणार आहेत.

यावेळी सौ. विश्वासराव म्हणाल्या, “विधानसभेच्या लढाईला अजून अवकाश आहे. मात्र येत्या एप्रिल महिन्यात ‘महाविजय २०२४’ च्या पहिल्या टप्प्यात आपल्याला देदीप्यमान यश संपादन करण्यासाठी आपली सर्वांची निवड झालेली आहे. येत्या १०० दिवसांमध्ये आपल्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार असून आपण सर्वजण निश्चितच यामध्ये आपली भूमिका ताकदीने निभवू असा मला विश्वास वाटतो.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button