विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळाच्या स्मरणिकाचे आ. शेखर निकम यांच्या हस्ते झाले अनावरण
चिपळूण - विलास गुरव

चिपळूण – मुंबई येथे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्ट तर्फे राज्यस्तरीय आदर्श मंडळ पुरस्कार देऊन ज्या मंडळाचा गौरव करण्यात आला अशा खेर्डीतील विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळ यावर्षी गणेशोत्सवाचे १० वे वर्ष साजरे करत असताना आज पर्यंत च्या सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रातील केलेल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून स्मरणिका प्रकाशित करण्यात आली तिचे आज गुरुवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लाडके व लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या हस्ते चिपळूण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्क कार्यालय येथे अनावरण करण्यात आले.
यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व माजी क्षेत्राध्यक्ष दादासाहेब साळवी,शहराध्यक्ष मिलिंद कापडी,खेर्डी ग्रामपंचायत चे माजी सरपंच व मंडळाचे मार्गदर्शक, दशरथ दाभोळकर,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष निलेश कदम,राष्ट्रवादी सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष, सचिन साडविलकर,खेर्डी ग्रा.पं सदस्य मा.श्री.रियाज खेरटकर,ग्रा.पं सदस्य राकेश दाभोळकर,मंडळाचे अध्यक्ष शशांक भिंगारे,माजी अध्यक्ष प्रशांत दाभोळकर,सचिव महेश पवार, सचिन भोसले,मुबिन माटवणकर, संभाजी यादव,तन्वीर खेरटकर,सोहम दाभोळकर,युवराज कवडे,श्री.वैभव गुरव,इतर सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



