वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित कृषी महोत्सवात ६ जानेवारी रोजी उत्कृष्ठ पशुधन स्पर्धा ; वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांचे पशुधन मालक यांना आवाहन

चिपळूण – वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सतर्फे दि. ५ ते ७ जानेवारी २०२४ रोजी चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी कृषी व पशु प्रदर्शन २०२४ ” कृषी महोत्सवात ६ जानेवारी रोजी ‘उत्कृष्ठ पशुधन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, या स्पर्धेतील पशूधन मालकांना आकर्षक बक्षीस सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे चिपळूणमध्ये कृषी महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सव चिपळूण नागरी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या शेजारील चिपळूण नगर परिषदेच्या सावरकर मैदानात सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत असणार आहे. या महोत्सवादरम्यान भरगच्च कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये ६ जानेवारी रोजी उत्कृष्ठ पशुधन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सर्वात जास्त दूध देणारी गाय- म्हैस, सुदृढ निरोगी सुंदर म्हैस, सुदृढ -सुंदर- गाय, सुदृढ- निरोगी- सुंदर म्हैस- वासरू, सुदृढ- निरोगी- सुदंर गाय -वासरू, सुदृढ- निरोगी- सुंदर बैल या प्रकारात ही स्पर्धा होईल. या स्पर्धेतील विजेते पशुधन मालक प्रथम क्रमांकास १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये, तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील सहभागी पशुधन मालकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहोळा ७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.
कृपया या स्पर्धेत सहभागासाठी आणि नाव नोंदणीसाठी खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा- ९८९०३९३८२३/७७२२०४५०४८, ९८३७६०७५७५७
या कृषी महोत्सवाचा कोकणातील शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करतांना शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवात सहभागी होतांना या स्पर्धेलादेखील उपस्थित रहावे, असे आवाहन वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.



