आपला जिल्हा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी नमुंमपा मुख्यालयात आयुक्त डॅा. कैलास शिंदे यांनी केले अभिवादन

नवी मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, अति.शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, मालमत्ताकर विभागाचे उपआयुक्त डॉ.अमोल पालवे, कार्यकारी अभियंता श्री.राजेश पवार, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button