आपला जिल्हा

रेल्वे तिकीट तपासनीस कडील रक्कम पळवुन चोरट्यांचे पलायन

चिपळूण - ओंकार रेळेकर

प्रवाशांकडून जमा केलेली दंडाची रक्कमच चोरट्याने टीसीकडील बॅगेतून चोरून नेल्याचा प्रकार चिपळूण रेल्वे स्थानकानजीक घडला. हा प्रकार २७ जुलैला घडला असून, चिपळूण पोलिस स्थानकात जगदीश वसंत खरात याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नागपूर ते मडगाव (०११३९) या रेल्वेतून
प्रवास करताना टीसीने प्रवाशांकडून दंड वसूल केला होता. ही दंडाची रक्कम वसूल करुन टीसीने आपल्याकडील बॅगेत ठेवली होती. २५ जुलैला सुटलेली ही रेल्वे २७ जुलैला

चिपळूण रेल्वे स्थानकादरम्यान आली. चिपळूण स्थानक ५ मिनिटांवर असतानाच जगदीश खरात याने चक्क टीसीने दंड वसूल केलेली ही रक्कमच लंपास केली. ही गाडी चिपळूण रेल्वे स्थानकात आली असता टीसीने याबाबत चिपळूण पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर चिपळूण पोलिस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चिपळूण पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button