आपला जिल्हा

कुंभारखाणी बुद्रुक येथे आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन

संगमेश्वर – प्राथमिक आरोग्य केंद्र कडवई अंतर्गत असलेल्या कुंभारखाणी बुद्रुक उपकेंद्रात मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर, २०२५ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ईसीजी, ब्लड शुगर, रक्त तपासणी (HB, CBC इत्यादी) साठी व्यवस्था करण्यात आली होती. शिबिरात तज्ञ डॉक्टरांचे पथक गावातील रुग्णांची तपासणी व आरोग्यविषयक सल्ला देण्यासाठी उपस्थित होते

याचसोबत गावांत पहिल्यांदाच डोळ्यांच्या डॉक्टरांच्या मार्फत मोफत डोळे तपासणी व मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले. सर्वांना मोफत चष्म्याचे वितरण सुद्धा करण्यात येणार आहे

या प्रसंगी कुंभारखाणी बुद्रुक गावातील आणि परिसरातील गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाचे उदघाटन गावच्या सरपंच वंदना सुर्वे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास कोंब फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सतीश जगन्नाथ सुर्वे, माजी सरपंच दिलीप मनोहर सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते संदीप काशिनाथ सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते अमित अनंत देसाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

हे आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी कुंभारखाणी बुद्रुक चे समुदाय आरोग्य अधिकारी निलेश लोंढे, आशा मानसी लाखण, मदतनीस रंजिता रघुनाथ शिंदे तसेच धनराज घुले – समुदाय आरोग्य अधिकारी,बालाजी गुट्टे – समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहायक हेमंत रावले, आरोग्य सहाय्यक रंजन घाग, आरोग्य सेवक अनिल बारिंगे, अभिजित चंदुरे,राजेश पाटील,संतोष जोन्वाल,हर्षवर्धन व्यवहारे,आरोग्य सेविका कल्याणी चव्हाण, श्रीमती उषा पारशे, डोळ्यांचे डॉक्टर हेमंत पाटील, लॅब टेक्निशियन श्रीमती पुरोहित, प्रियांका सावंत आणि वाहन चालक, अभिजित कदम यांनी या कार्यक्रमासाठी परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button