आपला जिल्हा

मोरोशी – खारेपाटण एसटी बस सेवा सुरू – विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ; आमदार सदाभाऊ खोत यांच्या मागणीला यश.

राजापूर – तालुक्यातील मोरोशी – केळवली मार्गे खारेपाटण (सिंधुदुर्ग) एसटी बस सेवा अखेर सुरू करण्यात यश आले आहे. या नव्या बस फेरीमुळे खारेपाटण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे.

मोरोशी, केळवली, मोसम या गावांमधील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कोणतीही बस उपलब्ध नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक पासचा लाभ घेता येत नव्हता आणि त्यांचे आर्थिक व वेळेचे नुकसानही होत होते. या समस्येवर अनेकदा पत्रव्यवहार करूनही उपाय मिळत नव्हता.

दरम्यान, यावर्षी पाचल – ताम्हणे – मोरोशी – केळवली – खारेपाटण या मार्गावर एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप, तसेच श्री. यशवंत रायबागकर त्यांनी मागणी केली होती. त्या अनुषंगाने माजी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्याकडे पंधरा दिवसांपूर्वी पत्रव्यवहार केली होती.

ही मागणीला यश आले असून परिवहन विभागाने मोरोशी येथून सकाळी ११ वाजता निघणारी व ११:४५ ला खारेपाटण येथे पोहोचणारी एसटी बस सेवा सुरू केली आहे. या बसमुळे विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी गैरसोय दूर झाली असून ग्रामस्थ व पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. स्थानिक शाळा व ग्रामस्थांच्या वतीने परिवहन मंत्र्यांचे, आमदार सदाभाऊ खोत यांचे त्याचप्रमाणे या प्रश्नी विशेष प्रयत्न केल्याबद्दल माझे आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button