आपला जिल्हा

विद्यार्थिनींना शिक्षकाचे अश्लील मेसेज? शिक्षक पसार झाल्याची चर्चा!!

रत्नागिरी – रत्नागिरीतील सुप्रसिद्ध शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थिनींजवळ गैरवर्तन केल्यानंतर या शिक्षकाच्या विरोधात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. या प्रकाराला २४ तास होत नाही तोच या शाळेतून तीन विद्यार्थिनींनी अश्लील मेसेज प्रकरण समोर आणले आहे. एका शिक्षकाकडून विद्यार्थिनींना हे मेसेज पाठवण्यात आल्याचं या तीन विद्यार्थिनींचं म्हणणं आहे, मात्र या संदर्भात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तू फार सुंदर आहेस… तू मला आवडतेस… शाळेच्या बाहेर मला भेट… अशा आशयाचे मेसेज करणाऱ्या आणखी एका लंपट शिक्षकाचा प्रताप त्याच शाळेत उघडकीस आला असल्याची चर्चा आहे. तीन मुली त्या शिक्षकाविरोधात पुढे आल्या आहेत. याविरोधात मंगळवारी काही पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेत धाव घेतली. मात्र आपलं बिंग फुटलंय, आता आपलं काही खरं नाही, हे लक्षात आल्यानंतर तो शिक्षक शाळेतून पसार झाल्याची माहिती मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button