आपला जिल्हा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अभिजीत खताते यांची निवड

चिपळूण - ओंकार रेळेकर

चिपळूण – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अभिजीत खताते यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीचे पत्र आमदार शेखर निकम यांच्या हस्ते नुकतेच सुपूर्द करण्यात आले. ही निवड युवक जिल्हाध्यक्ष अजिंक्य आंब्रे यांनी जाहीर केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते यांचे चिरंजीव अभिजीत खताते यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून काम करण्यास सुरुवात केली. या दोन्ही क्षेत्रात आपला प्रभाव पाडत वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. तसेच खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजय संपादन करत खेर्डीच्या विकासात आपले योगदान देत आहेत. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर आता राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे,माजी पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, संगमेश्वर तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, बाळू ढवळे, नितीन भोसले, संतोष जाधव, माजी नगरसेवक मनोज जाधव, गणपत चव्हाण, मंगेश बाडांगळे, युवक उपाध्यक्ष ओंकार गायकवाड, अक्षय चव्हाण, अनिकेत ओतारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button