आपला जिल्हा

जय मल्हार धनगर समाज विकास सेवा संस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न ; अघ्यक्षपदी लक्ष्मण झोरे तर उपाध्यक्षपदी तुकाराम येडगे यांची निवड

देवरुख – संगमेश्वर तालुक्यातील धनगर समाजाची मातृसंस्था असलेल्या जय मल्हार धनगर विकास सेवा रजिस्टर संस्थेची सर्वसाधारण सभा आज दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी मावळते अध्यक्ष दत्ताराम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली धनगर समाज भवन देवरुख या ठिकाणी पार पडली या बैठकीत कार्यकारी मंडळांची निवड करण्यात आली निवड झालेल्या कार्यकारी मंडळात अध्यक्षपदी लक्ष्मण झोरे तर उपाध्यक्षपदी तुकाराम येडगे यांची निवड झाली.

कार्यकारी मंडळ निवड

अध्यक्ष – लक्ष्मण झोरे
उपाध्यक्ष – तुकाराम येडगे
सचिव – अभिजीत शेळके
कार्याध्यक्ष – सुनिल बोडेकर
सहसचिव – शांताराम बावदाने
खजिनदार – कृष्णा बावदाने
सह खजिनदार – प्रकाश झोरे
महीला संघटक – नेहा आखाडे
प्रवक्ते – शांताराम शेळके

यांची निवड झाली तर सदस्यपदी पर्शुराम शेळके, भागोजी आखाडे, रविंद्र फोंडे, राजेंद्र शेळके यांची निवड करण्यात आली.

जय मल्हार धनगर समाज विकास सेवा संस्थेचे कामकाज २००६ पासून सुरु झाले त्यावेळी तालुक्यातील ३२ धनगरवाड्यांमध्ये समाजातील पदाधिका-यांसमवेत बैठक घेवून या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली तर २०१२ मध्ये जय मल्हार धनगर समाज विकास सेवा संस्थेला शासनाची मान्यता मिळून संगमेश्वर तालुक्यातील धनगर समाजाची मातृसंस्था बनली.
जय मल्हार धनगर समाज विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी कोसुंब देवरुख या ठिकाणी सभागृह बांधण्यात आले आहे.या सभागृहासाठी माजी आमदार सदानंद चव्हाण आणि आमदार शेखर निकम यांनी निधी उपलब्ध करुन दिला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button